खारेपाटण तावडेवाडीत भूस्खलन...!

डोंगर भागात राहत असलेली ६ कुटुंबासह ३३ माणसे स्थलांतरित | तहसीलदार दीक्षित देशपांडे घटनास्थळाला तातडीची भेट
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 09, 2023 17:09 PM
views 678  views

कणकवली : तालुक्यातील खारेपाटण या गावी येथून जवळ असलेल्या  डोंगर भागात तावडे वाडी येथे आज पहाटे येथील घराच्या बाजूला व अंगणात जमिनीला तडे व भेगा गेल्या घरांच्या पाठीमागे काही प्रमाणत दरड कोसळली आहे.यामुळे येथील नागरिक घाबरले असून घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणेकडून कणकवली तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार श्री राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात बाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच  प्राची ईस्वलकर यांनी याठीकणी प्रथम भेट देत नागरिकांना दिलासा दिला.

याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण तावडे वाडी येथील रहिवासी असलेले  बांधव आपल्या आपल्या कुटुंबासह  या डोंगर भागात गेली १४ वर्षापासून राहत असून येथे त्यांची ५ घरे असून ६ कुटुंबासह ३३ माणसे येथे राहत आहेत परंतु काल पासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगरी व जंगल भागात राहत असलेल्या या नागरिकांच्या घराना पहाटे तडे गेले असून काही काही प्रमाणात दरडी भाग कोसळत आहे यामुळे या घराना मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. 

आम्ही व्यवसायानिमित्त भटकत असलेली विस्थापित मोलमजुरी व मासेविक्री करून पोट भरणारे घोरपी समाजाची कुटुंबे असून आम्हला जिथे जागा मिळाली. तिथे आम्ही सद्या राहत आहोत.मात्र आमच्या जिवितला आता याठिकाणी धोका निर्माण झाला असून सरकारने आमचे पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरे बांधून द्यावीत अशी आमची मागणी आहे.सदा तावडे स्थानिक रहिवासी यांनी सांगितले.