सासोलीतील लँडमाफीयांना दणका | ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज तयार केलेप्रकरणी गुन्हा दाखल

सरपंच बळीराम शेटये यांनी पोलीसात नोंदवली फिर्याद
Edited by: संदीप देसाई
Published on: June 12, 2023 15:13 PM
views 422  views

दोडामार्ग : सासोली येथील सामायिक जमिनी सह हिस्सेदार शेतकऱ्यांच्या संमती नसताना धनदांडग्यानी जबरदस्तीने बळकावल्याचा मोठा आरोप सासोली येथील शेतकऱ्यांचा असताना आणि संबधिततांवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी अलीकडे आंदोलन छेडल्यानंतर अखेर सोमवारी सासोली ग्रामपंचायतचे सरपंच बळीराम कृष्णा शेटये यांनी त्या धनदांडग्या व्यवसायिका विरोधात सरपंच यांची बनावट सही व ग्रामपंचायतचा खोटा शिक्का वापरून खोटा दस्तावेज तयार केल्याचे रीतसर फिर्याद दोडामार्ग पोलिसात दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या फिर्यादीनुसार दोडामार्ग पोलिसांनी सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादनुसार सजद जैन (पूर्ण नाव माहीत नाही)या इसमावर फसवणुकीसह अनेक कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

सहसधरांच्या संमतीशिवाय जमीन खरेदी करून त्यात बिनशेती परवानगी मिळवण्यासाठी संबंधित  जमीन खरेदी करणार व्यक्तीने ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज तयार करून तसे पत्र तहसीलदार कार्यालयाला सादर केले, म्हणून ही फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

सरपंच बळीराम कृष्णा शेट्ये यांनी सलज जैन (पूर्ण नाव माहित नाही) (वय 65) राहणार - सासोली, यांचे विरोधात कायदेशीर फिर्याद  पोलिसात नोंद केल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर भादवी 420, 465, 467, 468 व 471 कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. अकृषिक सनद मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर तेथील काही ग्रामस्थांनी उपोषण छेडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर सासोली ग्रामपंचायतने पुढाकार घेत तेथील सरपंच बळीराम कृष्णा शेटये यांनी सोमवारी पोलिसात रीतसर फिर्याद नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दोडामार्गचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश चौधरी व त्यांचे टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे.