लाखे बांधव निघाले देवदर्शनाला

केसरकरांचे मानले आभार ; नगरसेवक बाबू कुडतरकर यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2026 17:42 PM
views 312  views

सावंतवाडी : शहरातील गोरगरीब लाखे समाजातील बांधवांना देवदर्शनाला पाठवण्याच स्वप्न नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी पुर्ण केलं आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. आज दोन लक्झरी बस या देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. 

अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, बाळुमामा, कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी लाखे बांधव निघाले आहेत. यासाठी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे त्यांनी आभार मानलेत. आज या यात्रेचा शुभारंभ नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सागर गावडे, लाखे समाज अध्यक्ष कृष्णा लाखेंसह लाखे समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कृष्णा लाखे यांनी बऱ्याच वर्षांची आमची इच्छा पुर्ण झाली आहे. देवदर्शनाचा लाभ होणार असून आम.दीपक केसरकर, संजू परब, बाबु कुडतरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.