युवराज लखमराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव ; वाढदिवस उत्साहात !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 02, 2023 20:15 PM
views 158  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांचा वाढदिवस ऐतिहासिक राजवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वस्तरातील मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी दै. कोकणसादच्या वाढदिवस विशेष पुरवणीच प्रकाशन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले.


युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांचा वाढदिवस ऐतिहासिक राजवाड्यात केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दै. कोकणसाद च्या वाढदिवस विशेष पुरवणीच प्रकाशन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरवणीच विशेष कौतुक राजघराण्याकडून करण्यात आलं. याप्रसंगी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अँड. नकुल पार्सेकर, एल.एम. सावंत, प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, पंचम खेमराज विधी महाविद्यालय, मदर क्विन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, ह.हा. राजमाता सत्वशीला देवी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.