लखमराजेंनी घेतलं सद्गुरू मियांसाब समाधीचं दर्शन..!

Edited by: विनायक गावस
Published on: June 14, 2023 16:41 PM
views 125  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी सद्गुरू मियांसाब यांचा ७८ वा पुण्यतिथी उत्सवा निमित्त समाधीस्थळी जात दर्शन घेतल. संसार करताना अध्यात्म व देशभक्तीचा संदेश मियांसाब यांनी समाजाला दिला होता. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले श्री सदगुरू मियांसाब यांचे सावंतवाडी संस्थान व राजघराण्याशी हितसंबंध होते. संस्थानच्या बांधकाम विभागात ते अधिकारी होते.

शहरातील रस्त्यासह आंबोली घाट रस्ता आदी मियांसाब यांच्या कार्यकाळात करण्यात आले. 'महंमद अबदुल्ला सद्गुरु' अर्थात सद्गुरू मियासाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यातिथी सोहळा साजरा केला जातो. यावर्षी ७८ व्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी देखील समाधीवर नतमस्तक होत सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी काका मांजरेकर, एल.एम.सावंत, उमेश कोरगावकर, प्रसाद अरविंदेकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.