'लाडकी बहिण' योजनेचा फायदा घ्यावा : मोहिनी मडगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2024 13:53 PM
views 58  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. राज्यातील श्रम बल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% आहे स्त्रियांची टक्केवारी 28.70% आहे. वस्तू तिथे वस्तुस्थिती लक्षात घेता आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. महिलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा शहर ग्रामीण भागातील सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य व सावंतवाडी महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.

 ही योजना 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला विधवा विवाहित परितकत्या महिला याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी महाराष्ट्रात असल्याचा रहिवासी अधिवास सर्टिफिकेट, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असावे, सदर महिलेचे बँकेत खाते असावे, रेशन कार्ड मध्ये महिलेचं नाव असावे, तसेच लागणारे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला सन 2025 पर्यंत वैध असावा, जन्माचा दाखला किंवा टीसी झेरॉक्स किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड व फोटो हे सगळं जमा करून तो ऑनलाइन फॉर्म भरावा. ही योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जात आहे. 

15 जुलै पर्यंत अर्ज भरायची शेवटची तारीख आहे.. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं महिला मोर्चा सावंतवाडी कडून आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती हवी असेल तर भाजप कार्यालय येथे संपर्क साधावा किंवा खासदार ऑफिस इथे संपर्क साधावा अस आवाहन महिला मोर्चा सावंतवाडी भाजपा कडून करण्यात आले आहे. यावेळी मेघना साळगावकर, साक्षी गवस, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते.