
सावंतवाडी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मोफत सुविधेचा आज थाटात शुभरांभ करण्यात आला. नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुनाबाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
माठेवाडा, सालईवाडा, जुना बाजार, मच्छी मार्केट, उभा बाजार या भागातील महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करावेत असे आवाहन सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर अमित गवंढळकर,परीक्षीत मांजरेकर, नागेश जगताप, नंदू गावडे,खुशी पवार, राहिल सासोलकर, गौरव बांदेकर ,अनुराधा पवार, अमीषा सासोलकर आदी उपस्थित होते