
वैभववाडी : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची शहरात प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असुन या कक्षामार्फतत ६० हुन अधिक लाभार्थ्याना विविध दाखले देण्यात आले असल्याची माहीती नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी दिली.
महिलांच्या आर्थीक स्वातंत्र्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात निर्णय घेतला आहे.महिला बालकल्याण व बालविकास विभागामार्फत या योजनेची अमंलबजावणी केली जात आहे.या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखल आवश्यक आहे.याशिवाय विविध कागदपत्रे लागणार आहेत.त्यामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने शहरातील नागरिकांना वेळेत कागदपत्रे उपलब्ध व्हावीत याकरीता स्वतंत्र कक्षच स्थापन केला आहे.या कक्षामध्ये नागरिकांना विनाविलंब घरपत्रक उतारा,रहिवाशी दाखला,दारिद्र्यरेषेखालील दाखला यासह आवश्यक विविध कागदपत्रे देण्यात येणार आहेत.आतापर्यत ६० हुन अधिक लाभार्थ्याना दाखले देण्यात आले आहेत.इच्छुकांनी तातडीने स्वतंत्र कक्षाशी सपंर्क साधुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी प्रसिध्दपत्रका द्वारे केले आहे.