
देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २२ दिपावाली पाडवा दिवशी सायंकाळी ०६:०० वाजल्यापासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव सन २०२५ प्रतिवर्षा प्रमाणे दिपावाली पाडवा वार बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजलेपासून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.यावर्षी 21 हजार पणत्यांची आरास करण्याचा मानस असून मंदिर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ केशव तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी खजिनदार उदय चंद्रकांत पेडणेकर, सदस्य संजय वासुदेव वाळके, सरपंच महेश ताम्हणकर, उपस्थित होते.
एकवीस हजार पणत्यांची आरास या उत्सवादरम्यान आरासकरण्यात येणाऱ्या पणत्या ह्या भाविक भक्तांच्या कडून प्रति दिवा १० रुपये प्रमाणे वर्षभरामध्ये संकलन होणाऱ्या निधीमधून करण्यात येते. असून या उत्सवात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या दीपोत्सव निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट – कुणकेश्वर प्रस्तुत श्रीपाद शांताराम जांबोडकर निर्मित “स्वर श्रीपाद” या सुगम संगीत मैफलीचे आयोजन,बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी संद्याकाळी ६ वा. करण्यातआले आहे. ह्या कार्यक्रमात पं. जयकृष्ण भाटीकर, सुभाष प्रभुदेसाई स्वरमंच मडगाव आणि शंकर महादेवन अकादमीचे शिष्य, झी मराठी सारेगमप “घे पंगा कर दंगा ” २०१७ फेम, प्रसिद्ध युवा गायक कलाकार, श्रीपाद शांताराम जांबोडकर(मडगांव- गोवा) तसेच युवा गायिका करिष्मा शेटकर (गोवा), युवा गायक साईश नाईक(गोवा) यांचा सहभागअसेल. त्यांना वाद्यवृंद साथी च्यारी(गोवा)(कीबोर्ड, सिन्थेसाईझर ) राज मडगांवकर (गोवा(तबला)प्रतीक कलाकार: केतनधामस्कर(गोवा)(संवादिनी) प्रीतम धामस्कर (पखवाज,टाळ) मैफलीचे सूत्रसंचालन: अलीशा नाईक करणार असून कार्यक्रमाची रूपरेषा मुख्य मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन :- सायं ०७:० मंदिर व मंदिर परिसरामधील दीपप्रज्वलन :- सायं ०७:१५ स्वर श्रीपाद (गोवा) – सांज मैफिल :- सायं ०६:०० ते ०८:३० सन्मान सोहळा :- रात्रौ ०८:३० ते ०९:००* पालखी प्रदक्षिणा सोहळा :- रात्रौ ०९:०० ते ०९:३० सांगता :- ०९:३० अश्या प्रमाणे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
तरी ह्या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही अध्यक्ष श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट – कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आली आहे.