कुणकेश्वर गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी अनंत वाळके

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 02, 2023 20:08 PM
views 142  views

देवगड : महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी कुणकेश्वर गाव चे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन अनंत वाळके यांची निवड ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आली. कुणकेश्वर गावचे सरपंच शशिकांत लब्दे यांच्या अध्यक्षतेखाली कुणकेश्वर ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली. त्या सभेत अनंत वाळके यांची कुणकेश्वर गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

अनंत वाळके यांनी यापूर्वी कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चे चेअरमन म्हणून काम केले असून कुणकेश्वर देवस्थानचे संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शिक्षण विकास मंडळ संस्थापक उपाध्यक्ष म्हणून काम केले होते .सद्यस्थितीत ते शिक्षण विकास कुणकेश्वर संस्थेचे संचालक आहेत. या सभेत माजी सरपंच गोविंद घाडी ,ग्रामपंचायत सदस्य सायली वाळके ,अस्मिता नाणेरकर अनिता पेडणेकर, सलोनी आईर तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण कोशाध्यक्ष अभय पेडणेकर,विश्वनाथ भुजबळ,कुणकेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर व्हॉइस चेअरमन सुहास नाणेरकर ,तुकाराम नाणेकर बाळा साइंम अंगणवाडी सेविका शुभांगी तेली, शरयू हिरलेकर दीपक घाडी माजी पंचायत समिती सदस्य निकिता कदम दीपिका प्रदीप मुणगेकर माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश मेस्त्री ,ग्रामसेवक गुणवंत पाटील व अन्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.