
देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर जञेचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, देवगड, कुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर येथे आरोग्य शिबीर, नेञ चिकित्सा शिबीर व अल्प दरात चष्मा वाटप याचे आयोजन, सिंधुदुर्ग बँक शेजारी, कुणकेश्वर येथे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी केले आहे. या जञेस येणाऱ्या सर्व भाविकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा.असे आवाहन तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी केले आहे.