
सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणकेरी गावाचा प्रसिद्ध हुडोत्सव १२ मार्च रोजी संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण गोवा कर्नाटकसह महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेला सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरीचा हूडोत्सव यंदा १२ मार्च रोजी ढोल ताशांच्या गजरात तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत व फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कुणकेरी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.