देवगड : देवगड तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसर २२ ऑगस्टला भाविकांसाठी बंद राहणार आहे. शुक्रवार श्री देव कुणकेश्वर देवस्थानचे दादरा वार्षिक होणार असून सदर वार्षिकावेळी दुपारी ०३:०० वा ते रात्रौ ०८:०० वाजेपर्यंत च्या कालावधी पर्यन्त कुणकेश्वर मंदिर परिसर काही वेळ भाविकांसाठी बंद राहणार आहे. या वेळेमध्ये कुणकेश्वर मारुती मंदीर तिठा ते कुणकेश्वर मंदीर, कुणकेश्वर महापुरुष पार (बाजारपेठ) ते कुणकेश्वर मंदिर, तारामुंबरी बीच ते कुणकेश्वर मंदिर पर्यंत चे सर्व मार्ग या कालावधीत बंद राहतील याची सवांनी नोंद घ्यावी. तसेच दिनांक २३ ऑगस्ट २०२५ वार- शनिवार रोजी सायंकाळी ०४:०० वा.ते सायंकाळी ०५:०० वा.या कालावधीमध्ये भावई वार्षिक होणार असल्याने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद राहील.याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घेऊन देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे असे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री एकनाथ केशव तेली यांनी आवाहन केले आहे.