
सावंतवाडी :
शेतकऱ्यांंसाठी असलेल्या सर्व शासकिय योजना यापुढे संस्थामार्फत राबवल्या जाव्यात यासाठी राज्य व केंद्रशासन प्रयत्नशील आहे. भविष्यात त्यामुळे संस्थाना महत्व प्राप्त होणार आहे. शेतक-यांची आर्थिक उन्नती झाली पाहीजे व त्यांच कुटूंब आर्थिक सशम झालं पाहीजे यासाठी जिल्हा बँक सदैव पाठीशी राहील. शेतकरी सक्षम झाला तर संस्था व पर्यायाने जिल्हा बँक आर्थिक सशम होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सावंतवाडी येथे केले. सावंतवाडी येथील पाटीदार समाज हॉल, कोलगांव तिठा सभागृहात गुरूवारी प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला. यावेळी मनिष दळवी बोलत होते.
मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक महेश सारंग, विद्याधर परब, माजी प.स. सभापती प्रमोद सावंत, सावंतवाडी ख.वि संघ चेअरमन बाबाजी ठाकुर, जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी.वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी संजय डंबे, विकास अधिकारी विलास धुरी,तसेच संस्था अध्यश, उपाध्यश सचिव संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा गौरव करत असताना सर्वच संस्थांनी तसे प्रयत्न करावेत. या उद्देशाने तसेच तालुक्यातील सहकारातील सर्व मंडळी एकत्र येऊन सहकार चळवळ वृदिंगत व्हावी म्हणून यावर्षी पासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे नियोजन केलेआहे आणि याचा शुभारंभ काल वेंगुर्ले येथून झाला.विकास संस्थानी कर्ज वाटप व वसुली अशा सर्वच बाबतीत आघाडीवर राहावे असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी केले.
३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १००टक्के वसुली केल्याबद्दल आरोंदा विकास संस्था, संस्थेचे अध्यक्ष रघुवाथ नाईक, उपाध्यक्ष अषोक धर्णे, सचिव अनंत नाईक कोलगाव विकास संस्था, संस्था चेअरमन विरेंद्र धुरी, उपाध्यक्ष नुतन थॉमस डिसोजा, सचिव रामा म्हैसकर, रामेश्वर विकास संस्था डेगवे, विकास संस्थेचे चेअरमन प्रविण देसाई, उपाध्यक्ष गणपत देसाई, सचिव प्रशांत कदम, भावई क्षेत्रपाल वकास संस्था कुणकेरी, विकास संस्थेचे अध्यक्ष नामदेव नाईक, उपाध्यक्ष श्रीम. सोनिया सावंत, सचिव श्रीम.प्रणिता सावंत, आरोस विकास सोसायटी, वाफोली विकास सोसायटी, सातार्डा विकास सोसायटी, वेर्ले विकास सोसायटी, चराठा वाकास सोयटी, देवसू विकास सोसायटी, चौकुळ विकास सोसायटी, अशा १००टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या ११विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव याचा सत्कार मनिष दळवी व संचालक रविंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच १०० टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या १३ विकास संस्थाचे चेअरमन, उपाध्यक्ष, व सचिव व संचालक याचाहि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मनिष दळवी पुढे म्हणाले की, जिल्हाभरात ९१ तर सावंतवाडीत ११संस्थानी १०० टक्के वसुली केली. विकाससंस्थाच्या उलाढालीमध्ये सावंतवाडी तालुक्याचा नंबर हा चौथा लागतो. जिल्हयातील जास्तीतजास्त संस्थानी आपली वसुली हि १०० टक्के करावी यासाठी त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क साघून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करता यावी यासाठी जिल्हयातील शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थाचा एकत्रित सत्कार समारंभ न ठेवता या वर्षी पासून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचे ठरले आहे. त्याचा शुभारंभ काल वेंगुर्लेतून झाला आहे. विकास संस्था या स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे त्यामाध्यमातून आपण शेतकऱ्यांना विविध सेवासुविधा उपलब्ध करुन देवू शकतो. विकास संस्थानी त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विकास संस्थानी फक्त पीक कर्जे शेतकरी यांना न देता अल्प, मध्यम मूदतीची कर्जे देवून त्यातून आपले उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी अल्प मूदत, मध्यम मूदत कर्ज योजना विषयी माहिती दिली. तसेच खावटी कर्जा संदर्भातही वस्तूस्थिती स्पष्ट केली. तर शेवटी अनिरुद्ध देसाई यांनी आभार मानले.