'ज्ञानी मी होणार' महोत्सव उत्साहात

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 30, 2025 16:10 PM
views 89  views

कुडाळ : केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळत असते, शिक्षक व पालक यासाठी अपार मेहनत घेत असतात पण जि प कडून या सापर्धांसाठी भरीव अनुदान मिळणे आवश्यक आहे ,संपूर्ण वालावल पूर्व केंद्रात एकमेव प्रशस्त मैदान असलेली शाळा चेंदवण  नं 1 आहे त्यामुळेच या स्पर्धा आयोजन शक्य असल्याचे असे प्रतिपादन चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी व्यक्त केले. वालावल पूर्व केंद्रस्तरीय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2025 या स्पर्धा शाळा चेंदवण नं 1 व चेंदवण हायस्कूल येथे संपन्न झाल्या.

यावेळी केंद्रप्रमुख श्री गोविंद चव्हाण, चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक, श्री. गोविंद भरडकर शा. व्य. अध्यक्ष, ग्राम स्थ श्री मयेकर , पोलिस पाटील श्री उमेश शृंगारे व सौ शुभश्री शृंगारे, शा. व्य. सदस्य श्री. स्वप्नील चेंदवणकर , रत्नदीप मेस्त्री, चेंदवण हायस्कूल मुख्याध्याक श्री माणिक पवार , श्री. संजय भरडकर , भोजन व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीने , मंडप डेकोरेटर गौतम चेंदवणकर,श्री. विनायक बाळकृष्ण प्रभू शा.व्य. समिती अध्यक्ष वालावल नं.1,,शाळा वालावल राऊळवाडी - शा व्य स अध्यक्षा सौ कृतिका कमलेश राऊळ,शाळा वालावल पूर्व शा.व्य.स अध्यक्ष सौ दिव्या चव्हाण उपाध्यक्ष सौ दिव्या सामंत,शाळा वालावल करमळी शा.व्य.स.उपाध्यक्ष श्री.किशोर गावडे,शाळा - कवठी नं १ शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री .मनिष वाडयेकर उपाध्यक्ष - श्रीम.साक्षी जोशी,शाळा कवठी गावकरवाडी  शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्रीम. प्रेरणा प्रकाश राणे,चेंदवण पडोशीच्या सौ मानसी गुरव, अक्षता तोरसकर, भरत शृंगारे, नरेश मयेकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना सौ रश्मी नाईक यांचे सहकार्यातून ट्राॅफी व मेडल्स वितरित करण्यात आली.तर शाळा चेंदवण नं 1 पालक व ग्रामस्थ यांचेकडून सर्वांना अल्पोपहार व भोजन व्यवस्था करण्यात आली. या स्पर्धेत लहानगट समूहगीत प्रथम शाळा कवठी नं 1,मोठा गट शाळा कवठी नं 1 ,समूहनृत्य स्पर्धेत लहान गट प्रथम शाळा चेंदवण नं 1 तर मोठ्या गटात प्रथम शाळा वालावल पूर्व ,ज्ञानी मी होणार लहान गट प्रथम शाळा वालावल पूर्व, मोठा गटात प्रथम कवठी नं 1 यांनी यश मिळवले. सूत्रसंचालन प्रशांत वारंग व संतोष वारंग यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण यांनी व्यक्त केले.