
कुडाळ : स्थानिक डंपर व्यावसायिक आणि गोव्याचे डंपर व्यावसायिक यांच्यामधील वाद उफाळल्याने गोव्याला वाळू वाहतूक करणारे तीन मोठे डंपर स्थानिक आणि पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. स्थानिक डंपर व्यावसायिक आणि गोव्याचे वाळू व्यावसायिक यांच्यामध्ये गेले कित्येक वर्ष वाद सुरू आहे गोव्याचे डंपर जिल्ह्यातून वाळू वाहतूक करतात याला स्थानिक व्यावसायिक आक्षेप घेत असून या आक्षेपाला न जुमानता गोव्याचे डंपर व्यावसायिक राजरोसपणे ही वाहतूक करीत आहेत आज सोमवारी सायंकाळी स्थानिकांनी वाळू वाहतूक करताना डंपर पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर काही काळ वातावरण तंग झाले स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील डंपर व्यावसायिकांकडे वाळू वाहतुकीचे पास नव्हते तर ते दुसरेच पास होते त्यामुळे स्थानिकांनी आक्षेप घेतला वाळू वाहतुकीचे पास नसल्याने गोव्याचेडंपर व्यावसायिक राजरोसपणे वाळू वाहतूक करतात याच आक्षेपावर हा वाद सुरू आहे . मात्र, प्रशासन ठाम कारवाई करत नसल्याने वाहतूक सुरूच असल्याचे स्थानिकानी सांगितले आता याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.










