
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव गावातील उबाठा सेनेला खिंडार पडले असून या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत यामध्ये सर्वाधिक उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांची संख्या आहे साळगाव गावातील विविध वाड्यांमध्ये उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये टिळवेवाडी, झिरंगवाडी, मेस्त्रीवाडी, नाईकवाडी, खेरवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.










