
कुडाळ : कुडाळ बस आगारासाठी आणखीन ३ नवीन एस.टी. गाड्या उपलब्ध झाल्या असून, या गाड्यांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कुडाळ आगाराला नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. १४ जानेवारी २०२५ रोजी आमदार निलेश राणे यांनी परिवहनमंत्री यांना पत्र देऊन मालवण साठी २५ तर कुडाळ आगारासाठी १३ नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर मालवण तालुक्यासाठी १० आणि कुडाळ तालुक्यासाठी ५ नवीन गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
अता पुन्हा नव्याने ३ नवीन गाड्या कुडाळ आगरासाठी प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी १३ ऑक्टोबरला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अवघ्या आठच दिवसांत या गाड्या कुडाळ येथे दाखल झाल्या आहेत.
या ३ नवीन गाड्यांमुळे कुडाळ-मालवण मतदारसंघातील एकूण नवीन एस.टी. बसगाड्यांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.