
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ-बांबार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ओरोस पंचायत समिती मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे युवा नेते अनंतराज नंदकिशोर पाटकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
अनंतराज पाटकर हे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांतून जनतेच्या संपर्कात राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांना एक नवी दिशा मिळत असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सर्वसाधारण आरक्षणामुळे मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाच्या वतीने अनंतराज पाटकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची चर्चा सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.