
कुडाळ : तालुक्यातील साळगाव येथील दहावीचा विद्यार्थी व होतकरू तरुण राज पेडणेकर याचे झाराप तिठा येथे झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी साळगाव येथील पेडणेकर कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण पेडणेकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याच सांगून त्यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळी शिवसेना पदाधिकारी संजय पडते व इतर उपस्थित होते.