
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. या दु:खद घटनेमुळे व्यथित असलेल्या कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
राणे यांनी कुडाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि दु:खामध्ये सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दादा साईल, विनायक राणे, दीपक पाटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










