वाडोस इथं उद्या भव्य रक्तदान - आरोग्य तपासणी शिबिर

योगेश (भाई) बेळणेकर मित्र मंडळ व भा.ज.पा. वाडोस यांचं आयोजन
Edited by:
Published on: September 19, 2025 18:58 PM
views 198  views

कुडाळ : भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात रक्तदान शिबिर, सशक्त नारी शक्ती अंतर्गत महिलांची रक्त तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे.

हे शिबिर शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात येणार असून, अनुपूर्णा हॉल, वाडोस येथे हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन योगेश (भाई) बेळणेकर मित्र मंडळ व भा.ज.पा. वाडोस यांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.