निलेश राणे आमदार झालेत | अभिषेक गावडेंनी नवस फेडला

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 15, 2025 14:53 PM
views 231  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी एक वर्षापूर्वी केलेला नवस काल रविवारी सिंधुदुर्ग राजा चरणी १००१ नारळ अर्पण करून फेडला. कुडाळ - मालवणचे निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी त्यांनी हा नवस केला होता.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.