
कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन निवेजे येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम (उर्फ भाई कदम) यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादासाहेब, महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, युवा उपजिल्हा प्रमुख स्वरूप वाळके, बांबर्डे विभागप्रमुख नागेश आईर यांच्यासह अणा भोगले, विजय जाधव, सिताराम, तातू लाड, साईनाथ पालव, किरण जाधव, निळकंठ लाड आणि विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे कुडाळ तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.