
कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.
कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू केली आहेत. ही कामे गणेश घाटापासून सुरू केली आहे. यामध्ये गणेश घाटाकडे जाणारे सर्व रस्ते व त्या रस्त्यावर आलेली झाडी तोडणे गणेश घाट साफसफाई करणे ही कामे हाती घेण्यात आली आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते वाडी वस्तीवरील जाणारे रस्ते सुस्थितीत करण्याची कामे सुरू केली आहेत.
टप्प्याटप्प्याने हि कामे करण्यास सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, ज्या गणेश घाटांची कामे सुरू झाली आहेत. त्या ठिकाणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर चांदणी कांबळी यांनी पाहणी केली. यामध्ये संगिर्डेवाडी येथील गणेश घाट, लक्ष्मीवाडी येथील महापुरुष मंदिराजवळील गणेश घाटाची पाहणी करण्यात आली.