
कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन 2025 तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित भव्य हाफ मॅरेथॉन १३ जुलै २०२५ रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ इथं आयोजली आहे.
या मॅरेथॉनचे प्रमोशन प्रसिद्ध आर्यमॅन मिलींद सोमण यांनी केलेले आहे.5, 10, 16 तसेच 21 किलोमीटरच्या मधून आतापर्यंत 1200 धावपटूंनी नोंदणी केली आहे सिंधुदुर्ग सोबतच मुंबई गोवा कोल्हापूर बेळगाव पुणे रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच या हाफ मॅरेथॉन से यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन 2025 सज्ज असल्याची माहिती टीम कुडाळ मान्सून रन यांनी बॅ नाथ पै एम आय डीसी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. जी. टी. राणे, श्री. अजित राणे, श्री. गजानन कांदळगावकर, श्री उमेश गाळवणकर ,डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत ,डाॅ प्रशांत मडव,रूपेश तेली,अमित तेंडोलकर, शिवप्रसाद राणे ,प्रणव प्रभू व श्री सचिन मदने इत्यादी उपस्थित होते
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे 2022 पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर ने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. हॉस्पिटल तर्फे रोटरी क्लब कुडाळ च्या सहयोगाने रक्तदान शिबिर, श्रवण दोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर, असे बरेच कार्यक्रम राबवले जातात.
आरोग्य साठी चालणे किंवा धावणे हे महत्त्वाचे आहे.व्यायाम व आरोग्य या बद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर सह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन,कुडाळ सायकल क्लब,रांगणा रनर्स,रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब,सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत. या मॅरेथॉन साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. आपले हृदय चालत राहावे यासाठी आपण चालत राहण्याचा मोलाचा संदेश घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सिंधुदुर्गातील दुस-या होऊ घातलेल्या पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा हेच टीम कुडाळ मान्सून रन चे ध्येय आहे.
ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील. कुडाळ एमआयडीसी मधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल.
५ किमी ची फन रेस असणार आहे यामध्ये रोख बक्षिस नसणार आहे .पण टी शर्ट व डिजीटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे.10 किमी ,16 किमी व 21 किमी प्रकारात वयोगटानुसार आकर्षक रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत चा निसर्ग रम्य रस्ता आपल्या पावलांच्या चळवळीसाठी वाट बघतोय.