
कुडाळ : पणदूर सातेरी मंदिर शेजारी हातेरी नदी पात्रात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नदी ओलांडून पलिकडे जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊन बाबली भोंगू वरक यांचा मृत्यू झाला.
यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, आणि कॉन्स्टेबल सागर देवार्डेकर हे देखील उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.