LIVE UPDATES

उद्योजक अनिल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून वह्या वाटप

आवाहनाला प्रतिसाद
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 05, 2025 21:21 PM
views 95  views

कुडाळ : बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ शाळा समितीचे उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने २०० गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दिड डझन वह्यांचं वितरण करण्यात आले.

अनिल कुलकर्णी यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यां विषयी काही कुडाळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना मदतीचे आवाहन करताच, अल्पावधीत दानशूर व्यक्तीकडून एक लाख रूपये (1,00,000/-) किमतीचे शैक्षणिक साहित्य मदत स्वरूपात मिळाली. मिळालेल्या मदतीतून विद्यालयाच्या  सभागृहात अनिल कुलकर्णी  व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांती पावसकर यांनी केले. तर आभार नूतन पिंगुळकर यांनी मानले.