कुडाळ - कविलकाटेत ५२ हजारांचा गांजा जप्त

गांजा बाळगणाऱ्या इसमाच्या आवळल्या मुसक्या
Edited by:
Published on: July 05, 2025 11:34 AM
views 171  views

कुडाळ : काविलकाटे-रायवाडी येथे कुडाळ पोलिसांच्या पथकाने घरात छापा टाकून संशयित आरोपीकडून ५२,०००/-रुपये किंमतीचा १.६८० कि.ग्रॅ. गांजा जप्त करुन ताब्यात घेतला. तसेच संशयित आरोपी विशाल सुरेश वाडेकर यास अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलिसांनी हि कारवाई केली अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या अंमली पदार्थाचे तस्करी, विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक तरुण परिश्रमाशिवाय झटपट पैसा मिळवुन मौजमजा करण्याकरीता अशा अंमली पदार्थाची विक्रीचे व्यवसायात गुंतलेले आहेत. या अंमली पदार्थांचा वापर हा सध्या बहुतेक प्रमाणात तरुण पिढी वर्गामध्ये होत असल्याने त्यांचे र्भावतव्य अंधारमय झालेले आहे. भविष्यात तरुण पिढी अंमली पदार्थाच्या अंमलाखाली जावुन त्यांचे र्भावष्य अंधारमय होऊ नये याकरीता पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या  वतीने शाळा, कॉलेज, सार्वनिक ठिकाणी जनजागृती करुन अंमली पदार्थाचे व्यसनांपासुन दुर राहण्याचे आवाहन केले होते.

अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याकरीता अंमली पदार्थांची सेवन व विक्री करणाऱ्या इसमांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा यांना आदेश केलेले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाण्याचे राजेंद्र मगदुम यांनी स्वतंत्र अमे अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले होते व त्या पथकामार्फत अंमली पदार्थाची विक्री, सेवन करणाऱ्या इसमांबाबत माहीती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.

आज दिनांक ४ जुलै रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या  खास बातमीदारामार्फत मौजे कविलकाटे रायकरवाडी येथे संशयित आरोपी  विशाल सुरेश वाडेकर हा आपल्या  राहत्या घरी गांजा विक्रीकरीता आणल्याची बातमी प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पो.नि. राजेंद्र मगदुम यांनी वरिष्टांच्या आदेशान्वये सापळा रचुन आरोपी याचे राहते घरी छापा टाकुन आरोपी याचे ताब्यात ५२,०००/-रुपये किंमतीचा १.६८० कि.ग्रॅ. गांजा जप्त करुन ताब्यात घेतला. तसेच आरोपी विशाल सुरेश वाडेकर यास अटक करुन ताब्यात घेण्यात आलेले आहे.

हिरे कारवाई ही  पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ.मोहन दहिकर, उर्पावभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  आदेशान्वये पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, संजय कदम, महेश भोई, समीर बांदेकर, गणेश चव्हाण, योगेश मांजरेकर, पद्मीनी मयेकर यांनी केलेली आहे. अंमली पदार्थ उदा. गांजा, चरस, एम.डी इत्यादी सारख्या अंमली पदार्थाचे सेवन किंवा ताब्यात बाळगत असल्यास त्या बाबतची माहीती पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे यांनी केलेले आहे. बातमी देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन राजेंद्र मगदूम यांनी केले आहे.