महिला बाल रुग्णालयाच्या बाजूला नवीन इमारतीसाठी जमिनीची मागणी !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 30, 2024 12:16 PM
views 124  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या बाजूला नवीन सुविधा होण्यासाठी अडीज एकर जागा आरोग्य विभागाला देण्यात यावी अशी मागणी कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट व ब्राह्मण समिती अध्यक्ष प्रकाश कुंटे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे श्री.शिरसाट यांनी सांगितले.

श्री.शिरसाट यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कुडाळ जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण असून महिला बाल रुग्णालय भव्य हॉस्पिटल झालेले आहे. परंतू नवीन सुविधा निर्माण नाही.आरोग्य विभागाकडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, त्यासाठी त्यांना नवीन जागेची आवश्यकता आहे. ती जागा कुडाळ महिला रुग्णालयाच्या बाजूला उपलब्ध आहे. कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले त्याच धर्तीवर कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय रुपांतर झाले असते तर रुग्णांसाठी या सर्व सुविधांची सोय कुडाळ तालुक्यातच झाली असती. कुडाळ शहराची वाढती लोकसंख्या पाहता,त्यासाठी आरोग्य सुविधा अतिशय कमी पडते.आय.सी.यु.,व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सप्लाय, औषध देण्यासाठी आयव्हि सेट,खास फाऊलेर बेड, डायलिसिस मशिन,सोनोग्राफी मशीन आदि उपकरणे असतात. कुडाळ सारख्या मध्यवर्ती ठिकाणी या सर्व सुविधा आवश्यक आहेत. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी असल्या तर अपघातातील गंभीर व्यक्तिंवर योग्य वेळी उपचार होऊन त्यांचे जीव वाचू शकतात. कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या बाजूला शासकिय इमारती मुळातच निर्लेखीत केलेल्या आहेत, त्या जागेचा आरोग्य विभागासाठी योग्य वापर व्हावा तसेच सर्व नविन सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी कुडाळ वासीयांची मागणी आहे.असे निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रीपाद पाटील यांनाही निवेदन दिले.