कुडाळचा आठवडा बाजार होणार मंगळवारी !

जिल्हा व्यापारी मेळावानिमित्ताने निर्णय
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 24, 2024 07:02 AM
views 813  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा ३१ जानेवारीला मालवण येथे होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेला कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ३१ ऐवजी मंगळवार ३० जानेवारी भरणार आहे.

याची बाजारात येणाऱ्या फिरते व्यापारी आणि तालुक्यातील ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.