कुडाळला आज मोफत "गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रम "

Edited by: प्रतिनिधी
Published on: May 20, 2023 10:54 AM
views 123  views

कुडाळ : व्हिजन फायनान्शियल सर्व्हिसेस , कणकवलीचे दुर्गाप्रसाद काजरेकर यांनी " म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक का व कशी करावी " या विषयावर गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. 

यामध्ये आर्थिक नियोजन म्हणजे काय? म्युच्युअल फंडाद्वारे आर्थिक नियोजन कसे करावे ? म्युच्युअल फंडाचे कोणते प्रकार आहेत ? टर्म इन्शुरन्स व हेल्थ इन्शुरन्स का करावा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी एनजे इंडिया इन्व्हेस्ट प्रा. लि. कोल्हापूर चे रिजनल मॅनेजर श्री. श्रीकांत गबाले व एसबीआय म्युच्युअल फंड कोल्हापूर चे ब्रॅंच मॅनेजर श्री. मंतेश बोरगल्ले उपस्थित राहणार आहेत. 

सदर कार्यक्रम हॉटेल स्पाईस कोकण , मुंबई-गोवा हायवे, कुडाळ येथे शनिवार दि. 20/05/2023 रोजी सायंकाळी 6.30 वा. आयोजित केला आहे. 

नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी  व्हिजन फायनान्शियल सर्व्हिसेसचे श्री. दुर्गाप्रसाद काजरेकर मो. 9403065323/8208292602/8275390862 यावर संपर्क करावा.