कुडाळ नायब तहसीलदार शिवीगाळ प्रकरण ; आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 05, 2023 20:25 PM
views 608  views

कुडाळ : बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाऱ्यावर डंपरवर कारवाई केल्यामुळे कुडाळचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार  यांना शिवीगाळ करून दमदाटी करणा-या ७ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या सातही संशयितांना  न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. 

मालवण-कुडाळ या मार्गावर केळबाईवाडी स्मशानभूमीजवळ सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना चार डंपरवर दि १ फेब्रुवारी रोजी कुडाळचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे यांनी कारवाई केली होती. याचा राग मनात ठेवून त्यांना  शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संशयितांना पोलिसांनी अटक करून ४फेबु. कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या वर भा.द.वि. कलम 353, 332, 327 379 143 144 147 148 149 323 504 506 352 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कुडाळ येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांनी अटक केलेल्या सर्व आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी ॲड. मेघा परब यांनी सरकारी वकील म्हणून पाहिले.त्यांनी महत्वपूर्ण व यशस्वी युक्तिवाद केला.