कुडाळ एम्आयडीसीच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील !

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे MIDE असोसिएशनच्या शिष्टमंडळाला आश्वासन
Edited by: भरत केसरकर
Published on: October 19, 2022 14:37 PM
views 261  views

मुंबई : जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून कुडाळ MIDE ही या जिल्ह्यातील सर्वात जुनी असून त्याच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन असोसिएशनच्या शिष्टमंडळाला सामंत यांनी दिले. 

उदय सामंत यांच्या मलबार हिल, मुंबई येथील मुक्ताई येथील निवासस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, उद्योजक व माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर आदी पदाधिकारी उद्योगमंत्र्याना भेटले. कुडाळ एम्. आय्. डि.मध्ये अनेक प्लाॅट रिक्त असून नव उद्योजकांना त्यांच्या विनंतीनुसार व मागणीनुसार दिल्यास नव उद्योजकांना त्याचा फायदा होवू शकतो तसेच विद्युत समस्येमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारनियमन व कमी दाबाच्या विद्युत पुरवठा याबाबत नवीन सबस्टेशनची मागणी असोशिएशनने केलेली असून त्यासाठी एम्. आय्. डि. सी. विभागाकडून सबस्टेशनला जागा तातडीने उपलब्ध करुन कार्यवाही करण्याची विनंती असोसिएशनने केली असून याबाबत आपण लवकरच सर्व उद्योजकांची बैठक घेऊन सर्व प्रश्र्न लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे उद्योग मंञ्याना सांगितले.