आ. निलेश राणेंकडून कुडाळ नगराध्यक्ष - नगरसेवकांचे कौतुक

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 11, 2025 16:23 PM
views 171  views

कुडाळ : कुडाळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक शहराला एकविसाव्या शतकातील शहर बनवण्यासाठी चांगले काम करत आहेत, असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. कुडाळ शहराला चांगले घडवण्याचे प्रयत्न नगराध्यक्ष आपल्या परीने करत आहेत, असे सांगत त्यांनी नगराध्यक्षांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी आ. निलेश राणे यांनी केवळ नगराध्यक्षांचेच नव्हे, तर कुडाळ नगरसेवकांचे देखील कौतुक केले. नळपाणी योजना, रस्ते, पर्यटन हेच चांगले काम कुडाळ मध्ये चालू आहे.  कुडाळच्या नगरसेवकांचे प्रयत्न शहर विकासासाठी महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले. कुडाळ शहराच्या प्रगतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.