
सिंधुदुर्गनगरी : सर्व पितृ अमावास्येचे औचित्य साधून कुडाळ येथील लायन्स क्लब कुडाळ-सिंधुदुर्ग तर्फे सविता आश्रम व आनंदाश्रम येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत लायन सदस्य मंजुनाथजी फडके यांच्या वतीने धान्य व नारळाचे वाटप करण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन आनंद कर्पे यांच्या तर्फे सर्वांना बिस्किट पुडे व लाडू वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे लायन्स सदस्यांना आश्रमातील अबालवृद्धांचे शुभाशीर्वाद घेण्याची संधी लाभली. यावेळी अध्यक्ष लायन आनंद कर्पे, ट्रेझर लायन जीवन जी बांदेकर, ॲड. समीर जी कुलकर्णी, ॲड. लायन वैद्य सर, लायन राजन जी कोरगावकर, लायन मंजुनाथ फडके, लायन रमेश जोशी उपस्थित होते.
आश्रमातील ज्येष्ठ सदस्य बबन काका यांनी या सामाजिक कार्याबद्दल लायन्स क्लब कुडाळ-सिंधुदुर्गचे मनःपूर्वक आभार मानले.










