कुडाळात गोवा बनावटीची दारू पकडली !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 08, 2023 19:08 PM
views 253  views

कुडाळ : कुडाळ शहरातील वरची कुंभारवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून ५ हजार ८०० रुपयांची गोवा बनवण्याची दारू पकडली. याप्रकरणी संदीप पावसकर (रा. वरची कुंभारवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना कुडाळ शहरातील वरची कुंभारवाडी येथे मोकळ्या जागेमध्ये संशयास्पद एक इसम पिशवी घेऊन फिरत असल्याचे या पथकाला दिसले त्याने या इसमाला विचारणा केली असता त्याने संदीप पावसकर असे नाव सांगून या पिशवीमध्ये गोवा बनवतीची ५ हजार ८०० रुपयांची दारू आढळून आली याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कोयंडे, हवालदार पी. एस. कदम, सी. आर. पालकर, यांनी केली असून याबाबत चंद्रहास नार्वेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.