कुडाळ पंचायत समितीची आमसभा तब्बल ७ वर्षांनंतर

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली २७ एप्रिलला होणार बैठक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 24, 2026 19:07 PM
views 58  views

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा तब्बल सात  वर्षानंतर प्रथमच 27 एप्रिल ला सकाळी 11 वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे कुडाळ पंचायत समितीच्या 2025 -26या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा या आमसभेत घेण्यात येणार आहे ज्यांना या आमसभेत  निवेदने द्यायची आहेत त्यांची ही निवेदने 26 एप्रिल दुपारपर्यंत स्वीकारली जातील अशी माहिती पत्रकार परिषदेत सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.

कुडाळ पंचायत समिती आमसभा पार्श्वभूमीवर आज सभापती मिलिंद नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर काका कुडाळकर उमेदचे गणेश राठोड आदी उपस्थित होते         यावेळी बोलताना सभापती नाईक म्हणाले कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ते आमदार झाल्यानंतर प्रथमच आमसभा होत आहे या अगोदरची आमसभा ही 2 मार्च 2019 मध्ये झाली होती त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर ही आमसभा होत आहे दरम्यानच्या चार वर्षाच्या कालावधीत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती 27 रोजी होणाऱ्या आमसभेला ज्यांना गावातील विकास कामावर इतर निवेदन द्यायची असेल त्यांनी 26 एप्रिल  दुपारपर्यंत ही निवेदने पंचायत समितीत स्वीकारली जातील.