गावठी बॉम्ब बनवताना गंभीर जखमी

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 14, 2026 20:26 PM
views 35  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील शेतकरी संतोष महादेव मासंग (वय ५०) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. यात संतोष मासंग हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कुडाळ ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. कदम ही व सहकारी घटनास्थळी उपस्थित होते. ही धक्कादायक घटना घडल्या नंतर परिसरात मोठा आवाज झाला आणि एकच खळबळ उडाली. या गावठी बॉम्ब स्फोटा मुळे परिसरात गावठी बॉम्ब तयार होत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 

रान डुक्कर व अन्य वन्य प्राण्याच्या शिकारी साठी शेतात तसेच जंगलात हे बॉम्ब पेरले जातात का? शिकाऱ्यांचे मोठे रॅकेट या भागात कार्यरत आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. या दृष्टीने पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे.