
कणकवली : प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे रविवार १५ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वा. काकड आरती, समाधीपूजन, सकाळी ११ वा. समाधीस्थानी लघरुद्र व आरती, दुपारी १ वा. खिचडी प्रसाद, दुपाराच्या सत्रात भजने, सायंकाळी ५ वा. प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक काढली जाणार आहे. तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातर्फे करण्यात आले आहे.










