काशिविश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 14, 2026 20:31 PM
views 26  views

कणकवली : श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रविवार १५ फेबु्रवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा, अभिषेक, ९ वा. लघरुद्र, ९.३० वा. श्रींच्या मंदिराभोवती पालखी मिरवणूक, रात्री ११ वा. ह. भ.प. किरण पारकर यांचे कीर्तन होईल. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.