रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाचा आढळला मृत्यूदेह

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 14, 2026 20:06 PM
views 41  views

कुडाळ :  कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत संबंधित इसम गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.