
कुडाळ : डॉ. प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ३९२ हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. डाॅ.प्रमोद वालावलकर यांच्या हितचिंतकांच्या वतीने व श्री देवी केळबाई मित्रमंडळाच्या सहकार्याने येथील श्री देवी केळबाई मंदिरात नुकत्याच घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे - गट - पहिला (इयत्ता पहिली व दुसरी) - प्रथम क्रमांक हर्षा भालचंद्र थवी ( जि.प.प्राथमिक शाळा क्र.1, आंदुर्ले), द्वितीय नताशा अनिल कुंभार (जि.प. प्राथमिक शाळा कुंभारवाडा,कुडाळ), तृतीय अंश दत्तप्रसाद जिकमडे (जि.प.प्राथमिक शाळा क्र.1,ओरोस मुख्यालय), उत्तेजनार्थ चैतन्य महादेव खरात (जि.प.प्राथमिक शाळा, एमआयडीसी - कुंभारवाडा - कुडाळ), लिनांशा हितेश नाईक (विद्यानिकेतन, ओरोस) व संस्कृती संतोष पालव (जि.प.प्राथमिक शाळा कुंभारवाडा,कुडाळ).
गट - दुसरा (इयत्ता तिसरी व चौथी) - प्रथम क्रमांक - प्रथम निखिल केळबाईकर (इंग्लिश मिडीयम स्कूल,कुडाळ), द्वितीय गोविंद सगुण केळुसकर (जि.प.शाळा कुंभारवाडा,कुडाळ), तृतीय स्वतिका रजनीकांत कदम (जि.प.प्राथमिक शाळा पडतेवाडी,कुडाळ), उत्तेजनार्थ तपस्या विशाल जाधव (जि.प.कुंभारवाडा शाळा,कुडाळ), आराध्य पांडुरंग रेडकर (विद्यानिकेतन, कसाल), श्लोक नागेश सावंत (डॉन बाॅस्को स्कूल,ओरोस).
गट - तिसरा (इयत्ता पाचवी ते सातवी) - प्रथम क्रमांक धनिषा निलेश परब (एस्.एल्.देसाई विद्यालय, पाट), द्वितीय देवांग सागर दांगट (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), तृतीय दक्षता नंदकिशोर जाधव (साळगांव), उत्तेजनार्थ स्वानंद देवदास मेस्त्री (कुडाळ - नाबारवाडी), सजुल योगेश सातोसे (बॅ.नाथ पै विद्यालय, कुडाळ), साईदत्त अनंत टंगसाळी (पोदार इंटरनॅशनल स्कूल,कणकवली). गट - चौथा (इयत्ता आठवी ते दहावी) - प्रथम क्रमांक राशी योगेश सातोसे (कुडाळ हायस्कूल,कुडाळ), द्वितीय तन्मय पुरुषोत्तम नेरुरकर (श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर), तृतीय बिंद्रा गुंडू कोलार (शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,साळगांव), उत्तेजनार्थ सर्वज्ञा सतीश गोठोसकर (बॅ.नाथ पै विद्यालय, कुडाळ), चिन्मयी रोहीदास पावसकर (कुडाळ हायस्कूल,कुडाळ) व अस्मी सचिन राव (विद्यानिकेतन, कसाल) यांनी प्राप्त केला. या स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत कला शिक्षक विलास मळगावकर (मळगाव) व कलाशिक्षक संदीप साळसकर (एस. एल.देसाई विद्यालय, पाट) यांनी केले. सर्व विजेत्यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाची तारीख लवकरच कळविली जाईल, असे सांगण्यात आले.










