कुडाळात 'माझी वसुंधरा अभियान - 5'

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 17, 2024 20:15 PM
views 161  views

कुडाळ : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5 सद्यस्थितीमध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये सुरु आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन करणे व वातावरणीय बदलाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे.

या अभियानामध्ये भूमी, वायु, अग्नी, जल आणि आकाश या पंचतत्वांचा समावेश आहे. शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे, वृक्षांचे संवर्धन करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे, घनकचरा विलगीकृत स्वरुपात मंटागाडीतर देणे, एकल नापर प्लास्टिक वर बंदी घालणे, Reduce Reuse recycle या तत्वांची प्रचार प्रसिद्धी करणे, cycle trackची निर्मिती करणे, पर्यावरणपूरक E- Vehicle च्या वापरास चालना देणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण करणेसाठी कार्यवाही करणे, आपत्ती व्यवस्थापन, वायूची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करणे, फटाक्यांवर बंदी घालणे, पाण्याचा व विजेचा वापर काटकसरीने करणे, सौर उर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, याचा समावेश होतो, या अनुषंगाने शहरात विविध प्रचार प्रसिद्धी उपक्रमाचे आयोजन कुडाळ नगरपंचायतीचे वतीने करण्यात येतात तसेच पुढेही विविध उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहेत तरी या सर्व उपक्रमांमध्ये शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, महिला मचत गट, शहरातील सर्व अशासकीय संस्थांनी , शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच यासाठी सर्व नागरिकांनी हरीत शपथ घेणे आवश्यक आहे.

हरीत शपथ घेण्यासाठी https://majhivasundhara.in/en/majhi-vasundhara-pledge या link वर जाऊन माहिती भरावी व हरीतशपथ घेऊन कुडाळ नगरपंचायतीस पर्यावरण संवर्धनाकरीता सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकांनी लावलेली झाडे, पर्यावरण संवर्धन, संरक्षण यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विविध social media वर upload करावेत व कुडाळ नगरपंचायत थे https://www.facebook.com/kudalnagarpanchayat.kudal या facebook ला tag करावेत, व नगरपंचायतीच्या https://www.instagram.com/kudalnagarpanchayat/ या instagramm account प्ला follow करावे असे आवाहन श्री अरविंद नातू मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत, नगराध्यक्षा सौ, अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष श्री, किरण शिंदे, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका कुडाळ नगर पंचायत यांजकडून करण्यात आले आहे.