सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

कोकणसाद LIVEचे कृष्णा ढोलम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 28, 2024 17:49 PM
views 209  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. शनिवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एक ज्येष्ठ व आठ आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड यावेळी करण्यात आले. पत्रकार दिनाच्या ६ जानेवारीच्या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा गौरव व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली. 

कणकवली मधून दैनिक तरुणाचे रमेश जोगळे यांना ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. दोडामार्ग मधून दै.लोकमतचे पत्रकार वैभव साळसकर, सिंधुदुर्ग नगरी मधून दै. तरुण भारतचे दत्तप्रसाद वालावलकर, मालवण मधून कोकणसाद लाईव्हचे कृष्णा ढोलम, देवगड मधून पुढारीचे सचिन लळीत, वेंगुर्ले मधून दै.तरुण भारत चे भरत सातोसकर,  सावंतवाडी मधून दै. पुढारीचे हरिश्चंद्र पवार, कुडाळ मधून दै. पुढारीचे काशीराम गायकवाड, वैभववाडी मधून दै.पुढारीचे मारुती कांबळे यांची जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी बैठकीत आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली. आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ही निवड झाली. यावेळी गणेश जेठे, बाळ खडपकर, संतोष सावंत, संतोष राऊळ, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, प्रवीण मांजरेकर, लवू महाडेश्वर, महेंद्र मातोंडकर, अमित खोत, लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर व सुहास देसाई आधी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांनी ही आदर्श पत्रकार पुरस्कार निवड केली. 

सिंधुनगरी येथील पत्रकार भावनात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा जिल्ह्याचा मुख्य कार्य क्रम संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, प्रमुख वक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत, व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी, पत्रकार हितचिंतकानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.