
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित , कृषिभूषण या पुरस्कारांनी सन्मानित शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले वेतोरे येथील संतोष गाडगीळ यांनी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करून संतोष गाडगीळ यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कृषी, सहकार, फलोत्पादन या क्षेत्रात ग्रामीण भागात त्यांच्याकडून भरघोस काम घडेल अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा सावंतवाडी येथे संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी निरीक्षक शेखर माने, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, यांच्यासह सावंतवाडी तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.