चिपळूण : नारळाच्या शुद्ध तेलामध्ये नैसर्गिक वनस्पतींचे १३ प्रकारचे नैसर्गिक घटक वापरुन, कोल्डप्रेस पद्धतीने बनवण्यात आलेले कोकणातील केसांची नैसर्गिक वाढ आणि सौंदर्य वाढवणारे एकमेव ब्रँड म्हणजे ," कृपा हेअर टॉनिक ".
कोणतेही रासायनिक रंग अथवा घटक न वापरता, ज्यात आवळा, वडाची साल, मेहंदी, ब्राह्मी, जास्वंद, भृंगराज यांसारख्या शक्तिशाली औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ज्यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते, केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांना निरोगी ठेवतात.
कृपा हेअर टॉनिकची वैशिष्ट्ये
✔ नैसर्गिक घटकांसह नैसर्गिक फॉर्म्युला
✔ केसगळती कमी करून नवीन केसांची वाढ आणि सौंदर्य प्रोत्साहित करतो.
✔ अल्पायुष्यात केस पिकणे आणि टक्कल पडण्यास प्रतिबंध आणि डोक्याच्या त्वचेला पोषण.
✔ पुरुष आणि महिला आबालवृद्ध सर्वांसाठी उपयुक्त.
रत्नागिरी जिल्ह्यातील धोपावे या छोट्या गावात १९८५ मध्ये सुरू झालेल्या "कृपा हेअर टॉनिक" ब्रँडने आज मोठी भरारी घेतली आहे. राजन दळी आणि रसिका दळी या दाम्पत्याने आपल्या मूळ गावातील बेरोजगारीची समस्या ओळखून, एका छोट्या १०० चौरस फूट खोलीतून उत्पादनाची सुरुवात केली. आज ते एक पूर्णतः सुसज्ज उत्पादन युनिटमध्ये रूपांतरित झाले आहे.
गेल्या ३९ वर्षांत, महाराष्ट्र आणि गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात "कृपा हेअर टॉनिक" यशस्वीपणे वितरित केले जात आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाकडून कोणताही दुष्परिणामाची तक्रार आलेली नाही. याचे श्रेय संस्थापकांच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि नैसर्गिक घटकांच्या वापराच्या तत्त्वज्ञानाला जाते. विशेष म्हणजे हे उत्पादन बालकांपासून प्रौढांपर्यंत, स्त्री-पुरुष दोघांसाठीही सुरक्षित आणि प्रभावी आणि गुणकारी आहे.
आज कृपा हेअर टॉनिक महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोव्याहून अनेक राज्यांत सर्व मेडिकल आणि जनरल स्टोअर्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. अधिक माहितीसाठी 7057838989 येथे संपर्क साधावा.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात लांब केसांसाठी नाव नोंदवलेल्या रेश्मा कांबळे ह्या बालपणापासून कृपा हेअर टॉनिकचा वापर करतात. संस्थापक अभिमानाने सांगतात की, आईने आपल्या मुलांच्या केसांचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी वापरलेले हे कृपा हेअर टॉनिक, आज मुलेही पुढच्या पिढीसाठी वापरत आहेत.