कोकणच विशाल नेतृत्व !

Edited by: भरत केसरकर
Published on: October 14, 2023 20:32 PM
views 304  views

जगात अशी काही माणसे जन्माला येतात की, ती आपल्या स्व कार्यकर्तृत्वाने समाजात स्‍वतःचा ठसा उमटवतात.अतिशय कमी वयात उत्तुंग भरारी घेतलेल्या विशाल परब यांची ही यशोगाथा..! त्‍यांचे नेतृत्‍व, शून्यातून वर येण्यासाठी त्‍यांनी केलेली धडपड, नेत्‍यांबाबत जपलेली एकनिष्‍ठता, सामाजिक बांधिलकीचे भान, उद्योगाविषयीचे प्रेम आणि या सगळयासोबत ते जपत असलेली कुटुंबवत्‍सलता यामुळे विशाल परब ‘युवकांचे आयडॉल’ बनले आहेत.कोकणातील या विशाल नेतृत्त्वाकडून युवकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे.विशाल परब यांच्या जीवनपटावर लक्ष्य वेधणारा हा लेख...

  विशाल परब यांचा जन्म माणगाव खो-यातील वाडोससारख्या ग्रामीण भागात १५ ऑक्टोबर १९८८ ला झाला. विशाल यांचे वडील प्रभाकर परब हे अतिशय गरिबीतून उद्योगपती झाले.वडील प्रभाकर परब यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. १९९२ च्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाडोस पंचायत समिती मतदारसंघातून ते विजयी झाले.विशाल परब यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय,माणगावमध्ये घेतले.यानंतर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात झाली.बारावीपर्यंतचे  शिक्षण माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यावेळी विशाल परब यांच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. वाडोस ते माणगाव पर्यंत प्रवास अतिशय कस्टमय पणे करत होते. मुंज यांच्या कॅन्टीन मधील  वडापाव ते आवडीने खायचे. विजय मुंज यांच्या कॅन्टीन मधील वडा आणि भजीचा चुरा पावात घालून खाणं हे त्यांचं मिष्टान्न होतं. पुढचे महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडीतील एस.पी. के. कॉलेजमध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं?नोकरी की व्यवसाय? हा प्रश्न होता. बी.कॉम. ची पदवी घेतली होती; परंतु नोकरीच्या मागे लागायचं नाही, असा चंग विशाल परब यांनी बांधला. आपल्या जुन्या व्यवसायाचा थोडाफार फायदा आपल्याला होऊ शकतो, हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या क्रशर उद्योगात उडी मारली. हा व्यवसाय  सुरू करून त्यांचा चांगला जम बसू लागला.

पत्नी सौ.वेदिका ह्यांच्या ‘लक्ष्मी’च्या पावलांनी सार जीवनच बदललं !

    २०१३ ला विशाल परब यांचे लग्न झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांचे प्रेम जुळले. यानंतर रितसर मागणी घालून त्यांचा विवाह झाला. पत्नी सौ.वेदिका विशाल परब ह्या उच्च शिक्षित आहेत.लग्नानंतर सौ.वेदिका यांच्या रूपाने विशाल परब यांच्या घरात जणू लक्ष्मीच आली.घरातील स्थिती बदलली. अनेक उद्योगधंद्यात विशाल परब यांनी गुंतवणूक सुरू केली. त्यांना यश मिळत गेले. अनेक मोठमोठ्या उद्योगांमध्ये ते उतरले होते. प्रचंड इच्छाशक्ती व काम करण्याची ताकद या जोरावर त्यांनी फार मोठे यश मिळवले. पत्नीने त्यांच्या उद्योगधंद्यात लक्ष देण्यास सुरूवात केली.पत्नी सौ.वेदिका ह्यांनासुद्धा चांगल्या व उंची गाड्यांची हौस आहे. त्या उत्कृष्‍ट सवारी करतात. त्यांना कु. भार्गवी विशाल परब ही मुलगी व कु. विराज विशाल परब हा मुलगा आहेत.  दोन मुलांच्या घरातील येण्याने विशाल व सौ.वेदिका यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला.धंद्याचा विस्तार वाढत गेला. आपलेही एक मोठे व सुंदर घर असावे, अशी इच्छा या दांपत्याची होतीच; त्‍याप्रमाणे सावंतवाडी-चराठा येथे स्वतःच्या स्वप्नातील बंगला तीन एकरात उभा केला.हा बंगला म्हणजे एक राजमहालच आहे.


   विशाल यांची राजकारणात ‘एंट्री’

    अनेक राजकीय लोकांशी विशाल यांचे संबंध येऊ लागले. नारायण राणे यांच्या नेतृत्वाने व कामाने ते प्रभावित झाले. नारायण राणे यांनी २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्ष कै. रमाकांत सावंत यांनी युवा नेते निलेश राणे यांची भेट घालून दिली. २००९ मध्ये नारायण राणे कुडाळ-मालवण मतदारसंघातून तब्बल २५ हजार मतांनी विजयी झाले. निलेश राणे यांच्या स्वभावाचा प्रचंड परिणाम विशाल परब यांच्यावर झाला. निलेश राणे यांचे ते चाहते बनले.अखेर निलेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या "सचिवपदी" विशाल परब यांची निवड झाली.२००९ मध्ये सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात निलेश राणे निवडून आले व खासदार बनले.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे वर्चस्व वाढत होते.यात विशाल परब सातत्‍याने निलेश राणे यांच्यासोबत राहिले. खासदार निलेश राणे यांच्या गळ्यातले ताईत बनले.त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.राजकारणासोबत  आपल्या कामात व  धंदा-व्यवसायात त्यांनी लक्ष देण्यास  सुरूवात केली.माणगाव खोऱ्यात त्यांनी राजकीय जम बसविण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विस्थापनांना धक्का देण्यास सुरुवात केली होती.स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी, ही इच्छा बाळगत त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली.

स्वतः जिद्दी असलेल्या विशाल परब यांनी  राजकारणामध्ये जिद्द सोडली नाही. ते सातत्याने माणगाव खो-यात काम करत राहिले. राजकारणासोबत समाजकारणावर त्यांनी भर दिला.अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले; मात्र २०१४ च्या  विधानसभेतील नारायण राणे यांचा नवख्या शिवसेनेचे उमेदवार  वैभव नाईक यांनी  पराभव केला; तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील निलेश राणे यांचा अनपेक्षित  पराभव विशाल परब यांच्या फारच जिव्हारी लागला.ह्या दोन्ही पराभवांनी ते फारच व्यथित झाले; पण ते डगमगले नाहीत.कठीण परिस्थितीत ते नारायण राणे,निलेश राणे व नितेश राणे यांच्या पाठीशी उभे राहिले.अनेकजण पक्ष व राणेंना सोडून जात होते; पण राणे कुटुंबीय हे आपले दैवत आहेत ही भूमिका घेत विशाल परब पडत्या काळातही राणेंसोबत राहिले.इथे त्‍यांची पक्षनिष्ठा दिसून येते.माजी खासदार निलेश राणे यांचा प्रत्येक वाढदिवस ते लाखो रूपये  सामाजिक उपक्रमांवर खर्च करून साजरा करतात.यात गोरगरीब जनतेला मदत करणे हा त्यांचा हेतू असतो. खासदार नारायणराव राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर दिल्ली गाटात अभिनंदन करून आशीर्वाद घेणारे विशाल परब यांना बघितल्यावर राणे यांच्यावर निष्पाप प्रेम करणारा कार्यकर्ता डोळयासमोर येतो. माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून यावेत, ही विशाल परब यांची मनोमन इच्छा आहे. हा क्षण लवकरच जवळ येईल, असा आशावाद ते व्यक्त करतात.

जुलै २०२१ मध्ये नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले. दिल्लीत जाऊन नारायण राणे यांचे अभिनंदन करणारी पहिली व्यक्ती  म्हणजे विशाल परब ! विशाल परब यांनी दिल्लीत जात नारायण राणे यांचे आशीर्वाद घेवून नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबईसह कोकणात नारायण राणे यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’चे नियोजन सुरू झाले. मुंबईसह तळकोकणात सुमारे तीन हजारपेक्षा जास्त ‘होर्डींग्‍स’ लावून विशाल परब यांनी एक प्रकारचा धमाका  करून टाकला. मुंबईत ‘मातोश्री’च्या समोर लागलेले विशाल परब यांचे ‘बॅनर्स’ लक्षवेधी ठरत होते. नारायण राणे यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ चर्चेत राहिली, ती विशाल परब यांच्या मोठमोठ्या ‘होर्डींग्‍स’मुळे !

  या यात्रेला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. आपले नेतृत्व पुन्हा एकदा जनसामांन्यापर्यंत पोहोचते, याचा फार मोठा आनंद विशाल परब यांना झाला होता. झाले ! ‘जनआशीर्वाद यात्रा’ यशस्वी झाली होती ! आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्येक वेळी मीडियाच्या माध्यमातून विशाल परब याने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली होती. ९ ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन झाले; आणि पुन्हा एकदा विशाल परब यांनी अधिकाधिक ‘होर्डींग्‍स’ लावून भाजपसाठी शक्तीप्रदर्शन तर केलेच; आणि या विमानतळाचे खरे शिल्पकार नारायण राणे हेच आहेत, हे  त्यांनी या  ‘होर्डींग्‍स’ च्या माध्यमातून दाखवून दिले. नारायण राणेंवर टीका करणाऱ्या प्रत्येक विरोधकांना त्यांनी शिंगावर घेत जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काम केले. यानंतर या दौऱ्याला चोवीस तास उलटले नाहीत, तोच सेनेच्या गोटात ‘भूकंप’ करीत आपले मित्र दादा साहिल यांच्या मदतीने तब्बल तीन शिवसेनेचे सदस्य फोडत मोठा राजकीय ‘धमाका’ घडवून आणला. यामुळे पुन्हा एकदा विशाल परब यांचे वजन ‘राणेदरबारी’ व ‘भाजपदरबारी’ वाढले.

कुटुंबवत्सल विशाल परब

विशाल परब हे कुटुंबवत्सल आहेत. त्यांचा परिवार मोठा असून घरात वडील प्रभाकर परब,आई सौ.प्रमिला परब,भाऊ प्रशांत परब,विकास परब, पत्नी सौ.वेदिका विशाल परब,मुलगी भार्गवी विशाल परब, मुलगा विराज विशाल परब,वहिनी असा त्यांचा मोठा परिवार आहे. विशाल परब हे सावंतवाडी-चराठा येथे स्वतःच्या नवीन बंगल्यात राहतात; परंतु गणेश चतुर्थी व इतर सणांना ते आजही एकत्र येवून सणाचा आनंद लुटतात. गरीब कुटुबांत जन्म झालेल्या विशाल परब यांनी आपल्या जीवनात खूप हालअपेष्टा सोसून उभारी घेतली आहे.एका साध्या ‘अॅप्याचे’ ह्या दुचाकीवरून सुरू केलेला उद्योगधंद्यातील प्रवास ‘बीएमडब्‍ल्‍यू’,‘मर्सिडिझ बेंझ’ ते ‘लॅण्डलव्हर्स’ येथपर्यत आला आहे. विशाल परब यांना उंची व देशी-विदेशी गाड्यांची फार आवड आहे. हल्लीच त्यांनी अत्याधुनिक तब्बल दोन कोटींची ‘रेंजरोव्हर’ ही अलिशान गाडी खरेदी केली आहे. तब्बल आठ ते दहा हजार स्‍क्‍वेअर  फुटाचा अालिशान बंगला सावंतवाडी-चराठा येथे  बांधून लहानपणीचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. लहान वयात अतिशय कमी कालावधीत जिद्द,चिकाटी,सचोटी व प्रामाणिकपणा यावर उद्योगात ‘नंबर वन’ बनून युवा उद्योजक विशाल परब हे युवकांचे ‘आयडाॅल’ बनले आहेत, यात कोणतीही शंका नाही.