
सिंधुदुर्ग : बळाराम पाटील हे शिक्षक नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकामधूनच आमदार झाला पाहिजे ही जनसामान्य शिक्षकांची भावना आहे. त्यामुळे मी शिक्षकांमधून उभा असलेला, सर्वसामान्य शिक्षकांचा कैवारी असलेला उमेदवार आहे. त्यामुळे शिक्षक मला विजयी करतील, असा दावा करत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री अर्थात किंगमेकर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, आमदार भरत गोगावले यासह मुख्याध्यापक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उमेदवारीने कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत एक रंगत निर्माण झाली आहे. आज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजप शिवसेना युती तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.