फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका !

आतापर्यंतचा सर्वाधिक दंड वसूल
Edited by: संदीप देसाई
Published on: May 22, 2024 07:09 AM
views 1087  views

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल 2024मध्ये एकूण 15,129 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 2 कोटी 69 लाख 85 हजार 256 दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.

एप्रिल 2024 मध्ये प्रकरणांची संख्या : 15,129

दंड वसूल : 2 कोटी 69 लाख 85 हजार 256 

कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे. येणाऱ्या काळात ही  KRCL च्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरू राहणार आहे.

अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.